भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपारोळा

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच घेतांना पंटरसह व्यापारी लाचलुचपतच्या जाळ्यात !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : पारोळा तालुक्यातील कंकराज येथील दिव्यांग तक्रारदाराकडून दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी पंटरसह एका व्यापारी या दोघांनी १० हजाराची लाच घेतांना मंगळवारी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात लाच स्वीकारतांना दोघांना रंगे हात अटक करण्यात आली.

याबाबत सविस्तर असे, पारोळा येथील ४९ वर्षीय तक्रारदार हे दिव्यांग असून, दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी त्यांना अनिल तुकाराम पाटील (वय-४६) रा. नागरदेवळा याने डॉक्टर माझ्या ओळखीचे असल्याचे सांगत  १० हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराने या बाबत लाच लुचपत विभागकडे तक्रार नोंदवली होती. मंगळवारी दुपारी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात अनिल तुकाराम पाटील याने तक्रारदाराला १० हजारांची लाच मागीतली. लाच स्वीकारल्यानंतर ती विजय रूपचंद लढे, क्य-६७,व्यवसाय-व्यापार रा.नगरदेवळा, यांच्याकडे सोपवली. लाच लुचपत विभागाच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली.

ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!