चिनावल येथील नवनगर मित्र मंडळाची स्वराज्य बॅन्ड, खर्डे. यांचे कडून फसवणूक.. गुन्हा दाखल करण्याची मागणी
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l चिनावल येथे नवनगर मित्र मंडळ दुर्गा देवी चे विसर्जनाची दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सांगता होती, त्या निमित्त मंडळाने विसर्जन करिता स्वराज्य बॅन्ड, खर्डे. तालुका – देवळा, जिल्हा नाशिक, हे बँड पथक ठरविले होते सदरचे बॅंडवाल्यास मंडळाने २० हजार रुपये फोन पे ने असे एकूण २० हजार रुपये ऍडव्हान्स रक्कम दिली आहे.
परंतु २० हजार रुपये अडव्हांस देऊन सुद्धा बँड मालक विशाल जाधव हे विसर्जनाच्या दिवशी बॅन्ड वाजवण्यास हजर राहिलेला नाही. त्यामुळे मंडळाचे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. मंडळातील महिलांचा रोष व्यक्त होत आहे. तरी सदर बॅन्ड पथक मालक विशाल जाधव यांनी आर्थिक नुकसान करून फसवणूक केली असता त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून द्यावी असा अर्ज नवनगर मित्र मंडळ यांच्या वतीने सावदा पोलीस स्टेशन येथे सुपूर्द केला आहे.. तरी मंडळाकडून बॅन्ड मालकावर कारवाईची मागणी सावदा पोलिसांकडे नवनगर मित्र मंडळाने केली आहे.