जळगाव जिल्ह्यातील तीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील ४२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल (आस्थापना) यांनी काढले असून यात जळगाव जिल्ह्यातील तीन पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे.
राज्यातील ऐकून ३०० सहायक पोलीस निरीक्षकांच्या विहित कालावधी पूर्ण झाल्याने तर १२० अधिकार्यांच्या विनंती बदल्या अशा ४२० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलिस स्टेशनचे जालिंदर पळे, यांचा समावेश असून, विशाल जयसिंग टकले आणि संदीप दुनगहू या तीन अधिकार्यांचा समावेश आहे.
रावेर तालुक्यातील सावदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांची कोल्हापूर तर विशाल टकले यांची पुणे शहर तर मुक्ताईनगरचे संदीप दुनगहू यांची छत्रपती संभाजी नगर परिमंडळात बदली करण्यात आली. दरम्यान, अधिकार्यांनी पदभार सोडल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षकांकडून येथे लवकरच अधिकार्यांची नियुक्ती करण्यात येईल.