नायगाव ग्रामसेवक यांची २ दिवसात बदली करा अन्यथा सरपंच ग्राम ग्रामपंचायत सदस्यांचा आंदोलन ईशारा
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | नायगाव ग्रामसेवक रविंद्र मोरे यांची २ दिवसात बदली करा अन्यथा नायगाव येथील सरपंच उपसरपंच व ग्राम ग्रामपंचायत सदस्य यांनी ठिय्या आंदोलन करण्याचे इशारा देत
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नायगाव येथील ग्रामसेवक यांची दोन दिवसात बदली करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत पंचायत समितीच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नायगाव तालुका मुक्ताईनगर येथील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मासिक मीटिंग, व ग्रामसभेत मंजूर केलेले ठराव प्रोसिंडिंग वर नोंद करत नाही
तसेच फेरफार साठी आलेले अर्ज मासिक मीटिंगमध्ये मंजूर करून सुद्धा त्यामध्ये फेरफार करत नाहीत वैयक्तिक लाभाच्या योजनांचे ग्रामसभेचे ठराव वरिष्ठ कार्यालयात पाठवल्यावरती त्या कार्यालयात जाऊन त्या ठरावाला ना मंजुरी देऊन स्वतःच्या सहीने सरपंचांची सही न घेता ग्रामपंचायत कव्हरिंग लेटर वर ग्रामसभेत मंजूर केलेल्या लाभार्थ्यांना वगळून त्यांच्या मनमर्जीपणाने नावे देऊन त्यांना लाभ देण्यास अधिकाऱ्यांवर दबाव आणतात गावात 15 वित्त आयोगाचे कामे सुरू असून पन्नास टक्के काम पूर्ण झालेले असून दप्तर क्लोज करत नाही तसेच बिल पास होऊ देत नाही
तीन महिन्यापासून गावात कुठेही घरपट्टी पाणीपट्टी कर वसुली करीत नाही. पंधरा वित्त आयोगातील कामे तसेच अनुसूचित जाती नव बौद्ध घटकातील कामे ठेकेदाराला दिली असून ते कामे त्यांना वेळेवर करू देत नाही व त्यांना सूचना देतात जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कामावर पूर्ण करायचे नाही अशा सूचना देतात गावात त्यांच्या नातेगोतेतील लोक असून ग्रामपंचायत प्रोसेंडिंग वर वैयक्तिक लाभांच्या योजनांमध्ये त्याच्या हाताने नावे लिहून जातात अशा अनेक प्रकारच्या विषयांवर ग्रामपंचायत सरपंच सुपडाबाई भालेराव, उपसरपंच गोपाल न्हावी, ग्रामपंचायत सदस्य विशाल पोहेकर, ग्रामपंचायत सदस्य ललिता कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रमिलाबाई पाटील, ग्राम व ग्रामपंचायत सदस्य पुताबाई भिल यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे.