भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनमहाराष्ट्र

राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | गेल्या काही महिन्यांपासून महायुती सरकार प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यां करीत आहे. आज पुन्हा राज्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?
1) अजीज शेख, व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मुंबई यांची बदली करण्यात आली आहे. त्यांचीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे इथ बदली करण्यात आली आहे.
2) अशीमा मित्तल या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक इथं कार्यरत होत्या. त्यांची नाशिकहून जालना जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
3) श्रीकृष्णनाथ पांचाळ जिल्हाधिकारी जालना यांची ठाणे जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
4) विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव महसूल मंत्रालय मुंबई या पदावर त्यांची बदली करण्यात आली आहे.
5) अनिल डिग्गीकर अप्पर मुख्य सचिव दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथून अप्पर मुख्य सचिव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई या पदावर बदली करण्यात आली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उद्या निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्णनाथ पांचाळ या आधी जालन्याचे जिल्हाधिकारी होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!