वरणगाव परिसरात अवैध वाळू वाहतुक, वाळू सह डंपर जप्त
भुसावळ. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरातून अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत पोलिसांनी वाळू सह डंपर जप्त केले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या पैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३० वाजता वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल चौक परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला राहुल सुकलाल भोई वय-२८, रा. भोई नगर, भुसावळ, तुषार नेरकर आणि भटू नेरकर दोन्ही राहणार जळगाव या तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या पैकी राहुल सुकलाल भोई वय-२८, रा. भोई नगर, भुसावळ याला अटक करण्यात आली आहे.सदरची कारवाई प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गुमळकर यांच्या पथकाने केली.