सातपुडा परिसरातील जानोरी – पाल परिसरातून शेकडो ब्रास मुरुमाची बिनधास्त अवैध वाहतूक
सावदा, ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l सातपुडा परिसरातून मुरुमाची बिनधास्त अवैध वाहतूक करून मोठी तस्करी केली जातं आहे. दररोज शेकडो ब्रास मुरूम कुठलीही रॉयल्टी न भरता अथवा कुठलाही परवाना न काढता वाहतूक होत आहे.
विशेषत: खिरोदा – पाल रस्त्यावरील जानोरी – हनुमान मंदिर परिसर, सातपुडा परिसरातून गौण खनिज ची दिवसाढवळ्या राजरोसपणे कुठलाही धाक न बाळगता चोरी होते.
जवळ जवळ २०० रुपये ढंपर प्रमाणे त्या ठिकाणाहून मुरूम घेतला जात असून तो सावदा व परिसर, फैजपूर व परिसर, असा रावेर – यावल तालुक्यातील परिसरात ३ ते ४ हजार रुपये प्रमाणे पोहोच विकला जातो.
दररोज कित्येक गाड्या मुरुमाच्या अवैध वाहतूक केली जात आहे. यांचे कडे कुठलीही शासनाची परवानगी, पावती नसते, रॉयल्टि भरल्याची यांचे कडे पावती नसते. खुलेआम वाहतूक केली जाते. महसूल विभागाने पथक तयार करण्यात आले आहे. परंतु ते पथक कागदावरच असून अज्ञातवासात आहे. त्यांची दक्षणा घरपोहच? मिळत असल्याचे एका वाहतूक दाराने खाजगीत नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.