भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चाळीसगाव

“कागदावर झाडे, प्रत्यक्षात रस्ते उघडे”- लाखोंचा घोटाळा, चाळीसगाव उपविभागात झाड लागवड घोटाळा- निधीचा अपहार उघड!

चाळीसगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव उपविभागात Tree Plantation 2023–24 या कामांतर्गत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाड लागवडीसाठी मंजूर रक्कम अंदाजे ₹ 8,43,720 ते ₹ 9,99,808 एवढी असून, बिलं व मोजमाप पत्रकांमध्ये गंभीर कलमफरेब केल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात लागवड न करता, Tree Guard, Auto Water System, मेंटेनन्स यांसारख्या बाबींचे खोटे दाखले देऊन शासन निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. स्थानिक स्तरावर प्रत्यक्ष पाहणी केल्यावरही अनेक ठिकाणी झाडे नसल्याचे दिसून आले. याशिवाय, नियमबाह्यरीत्या काशीद व गुलमोहर या प्रजातींचा वापर करून बिलं पास करण्यात आली, हीदेखील गंभीर बाब आहे.

या गंभीर घोटाळ्याविरोधात Crime and Corruption Control Association ने तक्रार दाखल केली आहे. माननीय महासंचालक दिनेश गुप्ता यांच्या आदेशाने ही तक्रार मंत्रालय स्तरावर सचिवांकडे दाखल केली आहे. परिणामी, प्रकरणाची चौकशी वरिष्ठ पातळीवरून सुरू झाल्याचे कळते.

या प्रकरणात चौकशी केवळ औपचारिक राहू नये, तर ती काटेकोरपणे पुढील बाबींवर केंद्रित असावी,

  1. कागदपत्रांची तपासणी – मंजूर संकल्पनापत्र, Abstract, बिलं, Measurement Books व Site Records यांची बारकाईने चौकशी.
  2. साइट व्हिजिट – GPS व फोटोसह प्रत्यक्ष झाडांची संख्या व प्रजातींची पडताळणी.
  3. आर्थिक फॉरेंसिक ऑडिट – शासनाला झालेलं आर्थिक नुकसान निश्चित करणे व संबंधितांकडून रिकव्हरी.
  4. गुन्हेगारी कारवाई – कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा व IPC अंतर्गत FIR दाखल करणे.
  5. विभागीय चौकशी – Maharashtra Civil Services Rules, 1979 नुसार शिस्तभंग चौकशी व कठोर शिक्षा.

ही बाब केवळ कंत्राटी गैरव्यवहारापुरती मर्यादित नसून सार्वजनिक निधीचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. त्यामुळे सदर विभागाच्या वरिष्ठ सक्षम अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी पारदर्शक, जलदगतीने व निष्कर्षापर्यंत नेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!