जळगाव

जळगाव जिल्ह्यात धरणात बुडून तिघांचा मृत्यू

जळगांव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या बालकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने धरणाच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. तर दोन जण पाण्यात उतरले नसल्याने ते बचावले असल्याची घटना आज दि. ३ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना वंजारी शिवारात असलेल्या भोकरबारी धरणाजवळ घडली.

पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच किशोरवयीन मुले दिनांक ३ ऑगस्ट रोजी पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. पीर बाबाचे दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज (वय १६), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय १४, रा. बडा मोहल्ला पारोळा), आवेश रजा शेख मोहम्मद (वय १७, रा. मालेगाव जि. नाशिक) येथील धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे या पाचही जणांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. धरणात उतरलेल्या तीन तरुणांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही.

त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून बुडाले. त्या पाच किशोरवयीन मुलांपैकी पाण्याच्या बाहेर उभी असलेले आश्रम पीर मोहम्मद (वय ९), इब्राहिम शेख अमीर (वय १४) यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत. दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली. घडलेल्या घटनेची आपबीती सांगितल्यानंतर स्थानिक नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचले. मात्र उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. यापैकी मोहंमद एजाज आणि मोहंमद हसन हे दोन सख्खे भाऊ आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!