भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

नशिराबाद येथे ‘वीरांना वंदन’ कार्यक्रमाचे आयोजन

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | स्वयंसंशोध फाउंडेशन, नशिराबाद यांच्या वतीने शहीद दिनानिमित्त “वीरांना वंदन – वीरपत्नी सन्मान सोहळा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूर जवानांना अभिवादन करण्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाचा गौरव करण्याचा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.


कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या वीरपत्नींना सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच देशरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. हा सोहळा केवळ कार्यक्रम नसून शौर्य, त्याग आणि राष्ट्रप्रेमाला दिलेला मानाचा मुजरा असल्याचे आयोजकांनी सांगितले.


हा कार्यक्रम रविवारी, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, नाशिराबाद (ता. जि. जळगाव) येथे पार पडणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश कोलते, धिरज सेतवाल, सागर धोबी आणि चेतन सपकाळे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!