गुरांची कोंबून वाहतूक करणारा ट्रक पकडला; आरटीओ चेकपोस्ट वरून ट्रक पास झालीच कशी ?
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी |बऱ्हाणपूर रोडवर आयशर ट्रकमधून गुरांची कोंबून अवैध वाहतूक करणार्या ट्रक ला गोरक्षकानी दीलेल्या माहितीवरुन गाडी जप्त करत तीन जणांना अटक केली आहे. परंतु आरटीओ चेक पोस्टवरून गाडी पास झालीस कशी असा प्रश्न गोरक्षकांसह नागरिकांना पडला आहे.
मुक्ताईनगर बऱ्हाणपूर रोडवर काल रात्री एएम एच २० ईएल ९८९८ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून गोवंशाची अवैध वाहतूक केली जात होती. गोरक्षकांनी गाडी अडवत पोलिसांना माहिती दिली बर्हाणपूर रोडवर धाव घेतली असता त्यांना सदर वाहन हे बंद पडलेल्या अवस्थेत लोकांच्या गर्दीने वेढले होते. यात १६ गुरांना अतिशय दाटीवाटीने वाहून नेले जात असल्याचे दिसून आले या वाहनासोबत शेख अस्लम शेख अकबर ( वय २४, रा. बोरगाव, ता. सिल्लोड) हा चालक आढळून आला. त्याला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
या प्रकरणी शेख अस्लम शेख अकबर ( वय २४, रा. बोरगाव, ता. सिल्लोड), शेख वजीर शेख नजीर (रा. वाघारी, ता. जामनेर ) आणि शेख आरीफ शेख नजरी कुरेशी ( रा. रसलपूर, ता. रावेर ) यांच्यावर पोलीस कर्मचारी चंद्रकांत नारायण बोदडे यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादवरून तिन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पूर्णाड आरटीओ चेकपोस्ट गोवंश तस्करीचे गोडबंगाल काय ?
वारंवार अवैध पैसे वसुली टोल काट्यात फेरफार अश्या अनेक कारणांनी चर्चेत असलेल्या पुर्णाड चेक पोस्ट वरती नेहमी आरटीओ गाडी तपासणी साठी असताना येथून अवैध गोवंश तस्करी करणारी गाडी पास होतेच कशी ? या आर्थिक देवाण घेणाव असल्याचा आरोप गोरक्षकांकडून होत असून अवैध वाहतुकीला कोण खतपाणी घालतय हे समोर येणे गरजेचे असून या चेकपोस्टचा मुद्दा आ. एकनाथ खडसे यांनी विधानरिषदेतही उपस्थित केला होता.