रावेरसामाजिक

निंभोरा स्टेशन येथे मंदिरात तुळजाभवानी मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा

गोलवाडे, ता. रावेर. . मंडे टू मंडे न्यूज, जीवन महाजन | रावेर तालुक्यातील निंभोरा स्टेशन परिसर आई तुळजाभवानी माता मंदिर उभारणे सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून व सहकार्यातून पूर्णत्वास आली असून मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात दिनांक 1 एप्रिल ते 4 एप्रिल होत आहे.

दिनांक एक एप्रिल रोजी निंभोरा येथील रेणुका माता मंदिर पासून कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माता तसेच गणपती व विठ्ठल रुक्मिणी देवतांचे गावातून नगर प्रदक्षिणा भजनी मंडळ सह भव्य मिरवणूक 1 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 12 पर्यंत निघेल निंभोरा स्टेशन येथे उभारण्यात आलेले मंदिराजवळ येऊन त्यानंतर पूजेला सुरुवात होईल तसेच दिनांक 2 एप्रिल रोजी 8 ते 2 वाजेपर्यंत होम हवन पूजा तसेच दिनांक 3 रोजी सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठ पूजा तसेच दिनांक 4 एप्रिल रोजी महाप्रसाद भंडारा सकाळी 11 वाजेपासून सुरू होईल.

प्राणप्रतिष्ठा सोहळा निंभोरा स्टेशन येथील निंभोरा उड्डाणपूला शेजारी हनुमान मंदिर उभारण्यात आलेला आहे .आई तुळजाभवानी मंदिर समोर भव्य यज्ञ भव्य मंडप करण्यात येणार आहे तसेच मंदिरावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई एलईडी लाइटिंग करण्यात आली आहे तसेच मंदिर सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी सर्वांचे दैवत असल्याने भाविकांकडून खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!