नववधूचे दागिने चोरले, मध्यप्रदेशातील दोघांना अटक
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | भुसावळ शहरातील बालाजी लॉनमधून नववधूचे दागिने चोरी करणा-या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह जेरबंद केले आहे. दिनाक 6/2/2026 रोजी फिर्यादी सौ. उज्वला प्रबोध भावे, वय-50, रा-भुसावळ यांचा मोठा मुलगा संकेत भावे याचे भुसावळ शहरातील बालाजी लॉन येथे लग्न होते. यातील नववधु कांचन यांचे लग्नाचे दागीने फिर्यादीकडे पर्स मध्ये ठेवलेले होते. लग्न विधी सुरु असतांना सुमारे 16/00 ते 16/30 वाजता कोणतरी सदरची दागीने ठेवलेली पर्स बालाजी लॉन येथील सोप्यावर ठेवलेली असतांना चोरुन घेवुन गेला.
या घटनेप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. दोघा चोरट्यांना बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. रितीक पिता सिंकदर सिसोदिया आणि कृषी पिता निरज बेडीया अशी मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातील दोघा चोरट्यांची नावे आहेत.
भुसावळ शहरातील बालाजी लॉन मधे 6 फेब्रुवारी रोजी एक लग्न समारंभ होता. या समारंभात नववधूची दागिने ठेवलेली पर्स सोफ्यावरुन चोरी झाली होती. या पर्समधे 1 लाख 92 हजार चारशे रुपये किमतीची सोन्याची पोत व 340 रुपये किमतीच्या चांदीच्या लवंगा असा एकुण 1,92,740 रुपये किमतीचा ऐवज होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोघा चोरट्यांचा शोध घेण्यात आला. मध्यप्रदेशातील राजगढ जिल्ह्यातून 1)रितीक पिता सिंकदर सिसोदिया
2) कृषी पिता निरज बेडीया दोन्ही राहणार-कडीया सांसी, तहसिल नरसिंहपुर, जि-राजगढ. मध्यप्रदेश, पोलीस स्टेशन-बोडा. या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, श्रेणी उप निरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चालक प्रमोद ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला


