भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

बोदवळमहाराष्ट्र

क्रिकेट सामना बघून परतताना क्रुझर वाहनाला ट्रकची जोरदार धडक, जळगाव जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू, ११ जखमी

नेवासा, जि.अहिल्यानगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | आज  सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता अहिल्यानगर -संभाजीनगर महामार्गावर अहिल्यानगर जिल्ह्यातील  नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीच्या १३ मुलांच्या  क्रुझर वाहनाला भीषण अपघात झाला. पुण्याहून क्रिकेट सामन्याहून परत येत असताना हा भीषण अपघात झाला, या भीषण अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून ११ मुले किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू मुले क्रुझर वाहनाने पुणे येथील गहुंजे येथे MPL अर्थात महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने बघण्यासाठी पुणे गेले होते. सामना आटोपल्यानंतर ते आज दिनांक ९ जून रोजी सकाळी सव्वा पाच वाजता MH २० DJ ४८३४ या क्रमांकाच्या क्रुझर वाहनाने बोदवडकडे परत येत असताना
त्यांच्या क्रुझर वाहनाला उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. क्रूझर गाडीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने गाडीचे छत अक्षरशः उडून गेले.


या भीषण अपघातात प्रथमेश योगेश तेली. वय १४ वर्ष , रा. जामखी दरवाजा, बोदवड. जिल्हा जळगाव. या तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर वृषभ बबन सोनवणे. वय १६ वर्ष. रा. बोदवड. जिल्हा जळगाव . या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोबत असलेले अन्य ११ जखमी मुले  नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत.

या अपघातात अकादमीचे एक शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा एक पाय निकामी झाल्याचे सांगितले जात आहे.

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.   रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.या संदर्भात नेवासा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने बोदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!