भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्यात पुन्हा दोन उपमुख्यमंत्री? परंतु मुख्यमंत्री कोण? उपमुख्यमंत्री कोण? केव्हा होणार शपथ विधी? महत्वाची माहिती आली समोर

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात पुन्हा एकदा भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीची सत्ता आली आहे. राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्र्यांचा पॅटर्न कायम राहणार असल्याची माहिती मिळत आहे. पण आता मुख्यमंत्री कोण? भाजपचा की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याबाबत राज्याच्या जनतेत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

परंतु मुख्यमंत्री हा भाजपचा होणार असल्याचं समोर येत असून भाजपकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख प्रबळ दावेदार आहेत.

दरम्यान नव्या सरकारच्या शपथविधी संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे, ती म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी हा सोमवारी किंवा मंगळवारी होणार आहे. शिवाजी पार्क किंवा वानखेडे स्टेडियमवर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथ विधीत महायुतीमधील कोणत्या नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे पहाणही महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं होतं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून १३७ जगांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. व महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महायुतीमधील अन्य दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिदे गटाला ५६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या आहेत.

तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला १५, शिवसेना ठाकरे गटाला २० तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ १० जागा मिळाल्या आहेत.

महायुतीनं २३१ जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला राज्यात एकूण ४५ जागाच जिंकता आल्या आहेत. महा विकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे विधानसभेत विरोधी पक्षनेता पदासाठी आवश्यक असलेलं २९ संख्याबळ नाही. म्हणून विरोधी पक्षनेते पदाबद्दल काय? विरोधी पक्षनेतेपदासाठी कुठल्याही एका पक्षाला २९ जागांची आवश्यकता आहे. .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!