पावसाळ्या आधीच हतनूर धरणाचे दोन दरवाजे उघडले
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्याला संजीवनी ठरलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली त्या मुळे शनिवारी रात्री अर्ध्या मीटरने धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.६२.८ क्युमेक्स म्हणजेच २२१७;क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शुक्रवारी रात्री पासूनच पाण्याची आवक वाढली त्या मुळे शंनिवरी रात्री आवक चे प्रमाण अधिक वाढल्याने रविवारी सकाळी आठ वाजता पहिला विसर्ग करण्यात आला.
हतनूर धरणात रविवारी सकाळी आठ वाजता २१०.६४० मीटर जल पातळी होती तर २१९.६० दलधमी जल साठा ५६.६० जलसाठा आहे. गेल्या वर्षी मान्सून पूर्व पावसाने धरणातून पाण्याचा मे महिन्यातच विसर्ग करण्यात आला होता. या वर्षी मात्र २२ दिवस आधीच विसर्गला सुरुवात झाली.