भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबुलढाणा

“मुलाला चांगले मार्क देऊ” दोन नराधम शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या आईवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शैक्षणिक क्षेत्राला हादरविणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला व गुरूंचा दर्जा असलेल्या शिक्षकांच्या विकृतीचा घृणास्पद प्रकार समोर आणणारी घटना बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातून उघडकीस आली आहे.
मलकापूर शहरातील एका खाजगी शाळेतील दोन शिक्षकांनी एका मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचे, गुण वाढविण्याचे आमिष दाखवून मुलाच्या आईवर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्या नंतर वेळोवेळी धमाकावत, आई व मुलाला ठार करण्याची धमकी देत तिच्या शरीराचे लचके तोडत अत्याचार केला. शेवटी या घृणास्पद प्रकाराला कंटाळून ३४ वर्षीय पीडित महिलेने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेनं मलकापूर शहरात मोठी खळबळ उडाली.

पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी समाधान इंगळे (वय ४५, राहणार मलकापूर) व अनिल थाटे (वय ४७ मलकापूर) या दोघा विरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या दोन नराधम शिक्षकांना अटक केली आहे.

पीडित ३४ वर्षीय महिला बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील रहिवासी असून ही आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मलकापूर येथे राहवयास आली होती. यातील समाधान इंगळे हा पीडितेच्या मुलाचा वर्ग शिक्षक आहे. दुसरा अनिल थाटे हा त्याच शाळेत शिक्षक आहे. यामुळे पीडिता व आरोपी यांची ओळख झाली, फोनवरून बोलणे सुरु झाले. चांगुलपणाचा आव आणणाऱ्या या शिक्षकांनी “तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ व पहिला नंबर आणू, त्यासाठी तू आम्हाला खुश कर” अशा प्रकारे मानसिक दबाव आणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

समाधान इंगळे व अनिल थाटे हे दोघे शिक्षक विद्यार्थ्याच्या आईला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत होते. नकार दिल्यास तिला जिवे मारण्याची धमकीही देत होते. असा वेळोवेळी तिच्यावर दोघां शिक्षकांनी बलात्कार केला. हा घृणास्पद प्रकार सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत मलकापूर येथे घडला.

शेवटी यामुळे पीडित महिला मानसिकदृष्ट्या पार खचून गेली. अखेर तिने धैर्य करून मलकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा नुसार गुन्हे दाखल केले आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या समाधान इंगळे (वय ४५, राहणार मलकापूर) व अनिल थाटे (वय ४७ मलकापूर)
या दोन नराधम शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची कोठडी देण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. कौळासे यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!