४३ बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी दोन मास्टरमाईंड वकील अटकेत ! यात जळगाव, एरंडोल, रावेर येथील नावांचा समावेश
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव शहरात ४३ जन्म प्रमाणपत्र तहसील दराच्या बनावट सह्या व शिक्के तयार करून कागदपत्र तयार केल्या प्रकरणी दोन मास्टरमाईंड वकिलांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.व या बनावट दाखले प्रकरणात जळगाव शाहूनगर, प्रिप्राळा,व एरंडोल , रावेर येथील लोकांची नावे आहेत.
४३ लोकांनी तहसील दारांच बनावट सहीच पत्र जळगाव महानगर पालिकेला दिले होते. त्या आधारे जन्मदाखला मिळविण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या ४३ लोकांपैकी ३५ लोकांना पोलिस स्टेशनला आणलं होतं. या ३५ लोकांकडून अशी माहिती मिळाली दोन वकिलांकडे त्यांचे कागदपत्र दिले होते. वकिलांनी प्रयत्न केले, की कसे तरी तहासील दरांचे दाखला मिळावा . परंतु त्यांच्या कडून हे होत नव्हत म्हणून त्यांनी स्वतः तहसील दराच्या नावे नमुना तयार करून त्याची प्रिंट काढून त्याच बरोबर जळगाव तहसीलदार म्हणून तहसील दरांचा बनावट शिक्का तयार करून त्या कागदावर बनावट सही करून व शिक्का मारून दिला होता.
अशा प्रकारे तहसीलदारांच्या बनावट सही व शिक्क्यांच्या आधारे जळगाव महापालिकेत खोटं जन्म प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणात शेख मोहम्मद रईस बागवान. शाहू नगर, जळगाव. आणि शेख मोहसीन शेख सादिक मणियार. जळगाव ( वय २६) या दोन मास्टरमाईंड वकिलांना अटक केली असून त्यांनी केलेला गुन्हा कबूल केला असून त्यांना आज कोर्टात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी याबाबत आज एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. तसेच या बनावट दाखले प्रकरणात जळगाव शाहूनगर, प्रिप्राळा, एरंडोल व रावेर येथील लोकांची नावे आहेत. असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.