दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार, जिवे मारण्याची धमकी
जळगाव जिल्ह्यातील संतापजनक घटना
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असून त्यात भर म्हणून जळगाव जिल्ह्यातही लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात उघळकीस आली आहे . वय ११ वर्ष व वय १३ वर्ष अशा अल्पवयीन दोन सख्ख्या बहिणीवर १० सप्टेंबर ते ११ सप्टेंबर च्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे आहे.
धरणगाव तालुक्यातील एका गावात मध्य प्रदेशातील कुटुंब वास्तव्याला असून या कुटुंबात ११ वर्षीय व १३ वर्षीय या दोन सख्ख्या बहिणी राहतात. याच परिसरात राहणारा नारधम विनोद हुसेन बारेला. रा.मध्यप्रदेश ह.मू. सावदा ता.एरंडोल. हा देखील राहतो. दि. १० ते ११ सप्टेंबरच्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर घरात कुणाला सांगितले तर दोघ पिडीत मुलींना मारून टाकण्याची देखील धमकी दिली. या घटनेमुळे एरंडोल तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पीडित मुलींनी हा प्रकार तिच्या आईला सांगितला असता तिच्या आईने धरणगाव पोलीस स्टेशनला आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दिली असून धरणगाव पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनोद बारेला याला अटक करण्यात आली आहे.