भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपारोळा

१५ हजारांची लाच घेताना दोन पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, एकास अटक, एक फरार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l तक्रार दाराच्या दुचाकीने अपघातात समोरील दुचाकी वरील ईसम मयत झाल्याने अटक न करण्यासाठी ३० हजारांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती १५ हजार रुपये घेताना दोन पोलिस हवालदाराना रंगेहाथ पकडण्यात येऊन त्यातील एक हवालदार फरार असून त्यांचे विरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे दि. २७/११/२०२४ रोजी मोटार सायकल ने पारोळा ते धरणगाव रस्त्यावर जात असतांना त्यांच्या मोटारसायकल ची समोरून येणाऱ्या मोटरसायकल शी धडक होऊन त्यामध्ये समोरील मोटोरसायकल वरील इसम मयत झाल्याने तक्रारदार यांचेविरुद्ध पारोळा पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला करण्यात आला होता.सदर गुन्ह्यात तक्रारदार यांना अटक न करणेकरीता हिरालाल देविदास पाटील पोलिस हवालदार पारोळा पोलिस स्टेशन. प्रवीण विश्वास पाटील. पोलिस हवालदार, पारोळा. यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रु लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची पंचासमक्ष पळताळणी केली असता हिरालाल देविदास पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,०००/- रू लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५,०००/-रु तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केली. तसेच हिरालाल पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरून पोलिस हवालदार प्रवीण पाटील यांना फोन करून तक्रारदार यांच्याशी बोलणे करण्यास दिले असता प्रवीण पाटील यांनी तक्रारदार यांना हिरालाल पाटील यांच्याकडे लाचेची रक्कम देण्यास सांगितले.त्याप्रमाणे हिरालाल पाटील यांनी तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून

हिरालाल देविदास पाटील वय- ४३ वर्ष, (पो.हवा.बं.नं. ३३७४) नेमणूक- पारोळा पो.स्टे.रा.प्लॉट. नं.६६, हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव. याना रंगेहाथ पकडण्यात आले असून प्रवीण विश्वास पाटील, वय.४५ वर्ष, (पो. हवा. ब.नं . २७१८) रा. पोलीस लाईन, बसस्थानका जवळ, पारोळा ता.पारोळा जि.जळगाव
हे फरार असल्याने त्यांचे विरुद्ध पारोळा पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कारवाई परिवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे , पोलीस उपअधीक्षक ,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे.यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- पंकज शिंदे ,पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे. पो. हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे ,जगदीश बडगुजर पो.शि.रामदास बारेला, प्रवीण पाटील सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!