भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

दोन पोलिस कर्मचारी लाच घेताना जळगाव एसीबीच्या ताब्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रात्री १० वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत २ हवालदारांना २० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे ४२ वर्षीय केंद्रीय अर्ध सैनिक बल मध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांचे व त्यांची पत्नी यांचे कौटुंबिक कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत त्यांच्या पत्नीने तक्रारदार यांचे विरुद्ध दिनांक ४/२/२०२५ रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याच्या चौकशी कामी रविंद्र प्रभाकर सोनार , पोलीस हवालदार. जळगांव शहर पोस्टे यांनी तक्रारदार यांना फोन करून चौकशीकामी पोलीस ठाणेस बोलावून घेतले होते. त्यांनी धनराज निकुभ,  पोलोस हवालदार. जळगांव शहर पोस्टे यांचे सोबत भेट घेऊन त्यांना गुन्ह्याचे तपासकामी अटक न करण्यासाठी, योग्य ती मदत करण्यासाठी, तसेच त्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल न पाठवण्यासाठी स्वतःसाठी व धनराज निकुंभ यांचे करवी ५० हजार रुपयाची मागणी केली होती.

निकुंभ यांनी तक्रारदार यांच्याकडे तगादा लावल्याने तक्रारदार यांनी दि. ११/०४/२५ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून दि. ११/ ०४/२५ रोजी पडताळणी कारवाई दरम्यान धनराज निकुभ यांनी तक्रारदार यांना ५० हजार रुपये ची लाच मागणी करून तडजोडीअंती २०,०००/-रु. स्वीकारण्याची तयारी दर्शविली.त्यावरून दिनांक ११/४/२५ रोजी सापळा कार्यवाही दरम्यान रविंद्र प्रभाकर सोनार , वय- ,४७ वर्ष, धंदा-नोकरी, पोलीस हवालदार. जळगांव शहर पोस्टे यांनी लाच रक्कम २०,०००/- रुपये पंचासमक्ष स्वतः स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले असून रविंद्र प्रभाकर सोनार , वय- ४७वर्ष, धंदा-नोकरी, पोलीस हवालदार.जळगांव शहर पोस्टे. व धनराज निकुभ , धंदा-नोकरी, पोलोस हवालदार. जळगांव शहर पोस्टे यांचे विरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे कलम ७,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर,
पोलिस उप अधिक्षक, ला. प्र. वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलिस निरीक्षक , ला.प्र.वि. जळगांव. पोउपनिरी सुरेश पाटील चालक
पोहेकॉ रविंद्र घुगे. पोहेकॉ जनार्दन चौधरी चालक
पोहेकॉ सुनिल वानखेडे पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/राकेश दुसाने, यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!