भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरजळगाव

तापी नदीत दोन शाळकरी अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | इयत्ता तिसरी व सातवीतील दोन शाळकरी मुले दि. २ रोजी तापी नदीत दुपारी ४ वाजता पोहायला गेली होती. अमळनेर तालुक्यातील निम येथील ही दोन्ही मुले पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाली. यात एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा शोध पट्टीचे पोहणारे रात्री उशिरापर्यंत घेत होते.

अधिक वृत्त असे कि, अमळनेर तालुक्यातील निम येथील इयत्ता तिसरीतील चेतन अरुण सुतार (वय १०) व इयत्ता सातवीतील हरीश बाळू पाटील (वय १२) अशी बुडालेल्या या बालकांची नावे आहेत. यात चेतन अरुण सुतार या मुलाचा मृतदेह सापडला असून त्यास डॉ. जी. एम. पाटील यांनी तपासणी करुन मृत घोषित केले. दरम्यान, चेतन सुतार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हरीश पाटील याचा शोध पट्टीचे पोहणारे नागरिक उशिरार्पत घेत होते. दरम्यान, तलाठी जितेंद्र जोगी यांनी रात्री उशिरापर्यत तापी नदी काठी थांबून नाविकांची ही शोध घेण्यासाठी मदत घेतली. घटनास्थळी मारवड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. जिभाऊ पाटील, सहायक फौजदार फिरोज बागवान, संजय पाटील, अगोने यांनी भेट देत पंचनामा केला.

दरम्यान, मृत चेतन अरुण सुतार याची आई चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील माहेरी बहिणीला घेण्यासाठी गेली होती. तर घरी केवळ वृद्ध आजी अन् आजोबा होते. तर हरीश बाळू पाटील यांच्या वडिलांची पानटपरी आ-हे. यातच आज गावात लग्न होते. लग्नाला आलेल्यांची वऱ्हाडींची गर्दी असल्यामुळे त्यांचे दुकान सुरुच होते. याच संधीचा दोन्ही मुलांनी लाभ घेतला आणि तापी नदीत पोहायला जाण्याचा बेत आखला, असा किस्सा त्यांच्या मित्रांनी सांगितला. सलग दोन दिवस झाले, एकूण समवयस्क ५ मुले नदीत पोहायला जात होते. मात्र, ही बाब कुटुंबियांना माहित नव्हती. तर आज लग्नानिमित्त इतर तीन मुले पोहायला गेले नाहीत म्हणून त्यांचा जीव वाचला. दोन्ही मुले बुडाल्याने गावावर शोक कळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावातील गुर्जर व सुतार समाजातील चुलच पेटली नाही. दोन्ही समाजातील शेकडो लोक रात्री उशिरापर्यंत नदीस्थळी थांबलेले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!