विनापरवाना अवैधरित्या चोरटी गौण खनिजची वाहतूक करणारे वाळूसह दोन ट्रॅक्टर जप्त
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यात विनापरवाना अवैधरित्या गौण खनिजची चोरटी वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर वर कारवाई करत वाळू सह दोन्ही ट्रॅक्टर यावल तहसीलदार यांनी जप्त केले आहेत .
दोन्ही ट्रॅक्टर विना क्रमांक असून दोन्ही वाहनांवर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले. महसुल प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळु माफीयामध्ये मोठी खळबळ उडाली आहे .
यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल चोपडा रोडवर किनगाव गावाजवळ शनिवार दिनांक ८ जुन २०२४ रोजी यावल शहर तलाठी ईश्र्वर कोळी, डोंगर कठोरा तलाठी वसीम तडवी, कोळवद तलाठी राजु बोरटे, आडगाव तलाठी श्वेता ससाने, यांच्या गस्ती पथकाने गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारावर धडक कारवाई करीत विनापरवाना अवैधरित्या वाळूची विना क्रमांकाच्या दोन ट्रॅक्टर मध्ये चोरटी वाहतुक करतांना आढळून आले असुन, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी कारवाई करीत जप्त केली.