दोन गावठी बनावटीचे कट्टा-पिस्तूल दोन जिवंत काडतूसां सह जप्त
भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्कl भुसावळ तालुक्यातील टहाकळी फाटयावर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे कट्याची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत वरणगाव पोलीसांनी दोघांना अटक करून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या जवळ दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुस असे ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील टहाकळी फाट्यावर सार्वजनीक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो. निरिक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक जितेंद्र जैन व पो कॉ योगेश पाटील यांनी टाहकळी फाट्यावर रविवारी दि. २३ जून रोजी रात्री ११:३० वाजता सापळा रचला. संशयित सागर प्रकाश डिके उर्फ सत्या (रा. टहाकळी ता. भुसावळ), आकाश विष्णू सपकाळे (रा. रायपूर ता. रावेर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे २ गावठी बनावटीचा कट्टा-पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. एकूण ३४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला सागर प्रकाश ढिके उर्फ सत्या,रा. टहाकळी ता. भुसावळ, व आकाश विष्णू सपकाळे. रा. रायपूर ता. रावेर. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.