जिल्ह्यात चोवीस तासात दोन महिलांची हत्या, अनैतिक संबंधातून गळा आवळून हत्या
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २५ सप्टेंबर बुधवार रोजी जळगाव जिल्ह्यात दोन महिलांच्या हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे चोवीस तासात दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे महिलेला चाकूने भोसकून खून केला. ही घटना २५ सप्टेंबर बुधवार रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यात घडली , तर चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द गावात महिलेचा अनैतिक संबंधातून खून केल्याची दुसरी घटना २४ ते २५ सप्टेंबर च्या रात्री घडली. ही घटनाही २५ सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी उघळकिस आली
अनैतिक संबंधात झालेल्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा गळा आवळून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द गावात घडली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
४५ वर्षीय महिला चोपडा तालुक्यातील गोरगावले गावात
आपल्या परिवारासह रहात असताना तिचे गावातीलच अनिल विरजी पावरा. वय ३५ वर्ष. या पुरुषा सोबत बऱ्याच वर्षांपासून अनैतिक संबंधय होते.परंतु त्यां दोघांमध्ये सारखी भांडण होत होती. याच भांडणातून २४ सप्टेंबर रोजीच्या रात्री १० ते २५ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी अनिल पावरा ह्याने कशान तरी गळा आवळून तिची हत्या केली. ही घटना सकाळी ५ वाजता उघडकीला आली.
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाअंती पोलीसांनी संशयित आरोपी अनिल पावरा याला अटक केली आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अनिल वीरजी पावरा याच्या विरोधात बुधवार २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता अडावद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.बपुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहे.