भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

जळगाव जिल्ह्यातील दोन तरुणांचा पवना धरणात बडून मृत्यू

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l पुण्या जवळील बालेवाडीतील खासगी कंपनीत कार्यरत असलेल्या भुसावळ मधील दोघा उच्चशिक्षित तरुणांचा पवना धरणात बुडाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावतील नगरमधील मूळ रहिवासी व सध्या पुणे येथे राहणारे मयूर रवींद्र भारसके (वय २५) व तुषार रवींद्र अहिरे (वय २६) अशी या घटनेतील मयतांची नावे आहेत. या संदर्भात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीतील आठ ते दहा मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते.

यातील दोघे जण दुधीवरे हद्दीतील पवना धरणाच्या पाण्यात दुपारी ४ वाजता वाजता पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. बुडत असल्याचे पाहून मित्रांनी आरडाओरड करत स्थानिकांना कळविले. त्यांना वाचवण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, धरणात बुडालेल्या दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, एकाच वयोगटातील शहरातील दोन्ही तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुण्यासह भुसावळ शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!