भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

जिल्हा परिषदेच्या दोन अभियंत्यांना २ लाख १६ हजारांची लाच घेताना अटक

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात, तसेच सध्याच्या प्रलंबित कामाचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यास २ लाख १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कारवाई ही नाशिक जिल्ह्यात करण्यात आली.

तक्रारदार हे शासकीय कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी सावरपाडा, तालुका दिंडोरी येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवार पाडा येथील यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सध्याच्या प्रलंबित असलेले कामाचे बिल मंजूर करून देण्याचे मोबदल्यात लाच म्हणून २,१६,०००/- रुपये रकमेच्या लाचेची पंचा समक्ष योगेश नारायण घारे, वय–४४ , उपअभियंता यांनी मागणी करून
मनीष कमलाकर जाधव वय २९ वर्ष. कनिष्ठ अभियंता यांनी योगेश घारे यांचे संगनमताने लाच मागणी करू स्वीकारली.

सदर लाचेची रक्कम २ लाख १६ हजार रु. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, दिंडोरी पंचायत समिती दिंडोरी कार्यालयात स्वीकारताना योगेश घारे यांना ८ ऑगस्ट २०२५ रोजी रंगेहाथ पकडण्यात आले.

त्या नुसार आरोपी १) योगेश नारायण घारे, वय–४४ ,
पद- उपअभियंता वर्ग = १, जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग दिंडोरी, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभाग दिंडोरी, ता. दिंडोरी, जिल्हा नाशिक. रा. ६०१ तिरुमाला भूमिका बी विंग उत्तरा नगर ,गल्ली नंबर एक तपोवन लिंक रोड, काटे गल्ली द्वारका, नाशिक शहर.
२). मनीष कमलाकर जाधव वय २९ वर्ष. पद=कनिष्ठ अभियंता, वर्ग ३ पाणीपुरवठा विभाग दिंडोरी पंचायत समिती कार्यालय दिंडोरी जिल्हा नाशिक. राहणार=कुंज विहार सोसायटी, हिरावाडी पंचवटी ,नाशिक
त्यांचे विरुद्ध दिंडोरी पो.स्टे. येथे भ्र.प्र.अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई सापळा व तपासी अधिकारी श्री अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक. सापळा अधिकारी स्वप्नील राजपुत पोलीस निरीक्षक ला. प्र. विभाग, नाशिक. पो.हवा. संदीप हांडगे, पो.शी . सुरेश चव्हाण, पोना . किरण धुळे, चालक पोलीस हवालदार परशुराम जाधव सर्व नेमणूक ला.प्र.वि.नाशिक युनिट यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!