भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नाशिकराजकीय

उद्धव ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, “पुढे काय काय होतं, एका आठवड्यामध्ये बघा” गिरीश महाजनांचे सूचक वक्तव्य

नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यात मोठा राजकीय भूकंपाचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांच्या कडून देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. पुढच्या आठ दिवसात बघा त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही.

संजय राऊतच पक्ष संपवतील
नाशिक मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊतांच्या बोलण्यामुळं स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पण पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत असे महाजन म्हणाले.

नाशिक शहर व जिल्ह्यामध्ये अनेक नेते सर्वपक्षीय नेते प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत, पुढे काय काय होतं, एका आठवड्यामध्ये बघा असे सूचक वक्तव्य महाजन यांनी केलं. एका आठवड्यामध्ये तुम्हाला चित्र स्पष्ट होईल. सगळे मोठे प्रवेश असतील, काही पक्ष नेस्तानाभूत होतील असेही गिरीश महाजन म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!