ब्रेकिंग : आमदारांचा आक्रमक पवित्रा, समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कानशिलात भडकावली
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी समाजकल्याण विभागाकडून ई-रिक्षा देण्यात आल्या होत्या. मात्र, ज्या दिवशी या रिक्षा दिल्या, त्याच दिवशी त्या बंद पडल्या. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती आमदार बच्चू कडू यांच्याकडे आले होते. त्यावेळी, बच्चू कडू यांनी संबंधितांना जाब विचारताना बच्चू कडू यांचा पारा चढला आणि त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या कानशिलातच लगावल्यान मोठी खळबळ उडाली. ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली.
प्रहार संघटनेचे आमदार नेहमी दीव्यांगांसाठी मोर्चे,आंदोलने, अशा अनेक प्रकारच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी पांगा घेत असतात. आज आमदार बच्चू कडू हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. त्या वेळी त्यांचे कडे अंध-अपंग बांधव त्यांच्याकडे समस्या घेऊन आले की ज्या दिवशी ई-रिक्षा दिव्यांग बांधवांना दिली त्याच दिवशी ती बंद पडली.या बाबत आमदार बच्चु कडू यांनी प्रशासकीय व ई-रिक्षा कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानउघाडणी करत जाब विचारला. त्यात त्यांचा पारा चढल्याने यावेळी त्यांनी एका अधिकाऱ्याला कानशिलात लगावली.