ब्रेकिंग : अहमदनगर नव्हे “अहिल्यानगर” केंद्राची मंजुरी
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर “अहिल्यानगर” करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यामुळं यापुढं हा जिल्हा “अहिल्यानगर” म्हणून ओळखला जाणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ करण्याची देखील मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्या मागणीला आता यश आले असून महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आता ‘अहिल्यानगर’ या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माहिती दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे.