ब्रेकिंग : सिने अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात दाखल
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे, आज पहाटेच्या वेळी सिने अभिनेता गोविंदा ला बंदुकीची गोळी लागून तो जखमी झाला आहे, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे पाच वाजेच्या दरम्यान गोविंदाला त्याच्या पायाला त्याच्याच लायन्सस रिव्हॉल्वरमधून गोळी लागली आहे.त्याला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते, बाहेर जाण्याची तयारी सुरू असतानाच हा अपघात घडला आहे. या घटनेत गोविंदा जखमी झाला असून, घटनास्थळी पोलिस दाखल होत त्यांनी गोविंदाची बंदूक ताब्यात घेतली आहे. गोविंदाच्या पायातून खूप रक्त वाहत आहे. रक्त थांबत नसल्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याच्यावर अंधेरीच्या कृती केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.