भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : भाजपने सोपविली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेवर मोठी जबाबदारी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या पाश्र्वभूमीवर भाजपकडून विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे

रविवारी भाजपच्या कोअर कमिटीची एक बैठक पार पडली.
विधानसभेसाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. तर मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या याचे अधिकारही भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजत आहे. या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने घेतलेल्या निर्णयानंतर आता महायुतीत भाजपने किती जागा लढवायच्या याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांना घेता येणार आहे.

तसेच या सोबत मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांना सोपवले आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच भाजपची यादी जाहीर केली जाणार आहे. तर मित्र पक्षांचा योग्य आदर राखला जाईल, असं एकमत बैठकीत झालं आहे. तर भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजप वरिष्ठांनी घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!