ब्रेकिंग : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे नेपाळ कडे रवाना
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतीनिधी l नेपाळ मध्ये भाविकांची बस नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली,यात १४ भाविकांना जलसमाधी मिळाली. यातील भाविक जळगाव जिल्ह्यातील वरणगाव व तलवेल परिसरातील आहेत.
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मंत्री म्हणून PMO कार्यालयातून नेपाळ ला अपघात घटनास्थळी जाण्यासाठी प्रोटोकॉल होता. आणि त्या बद्दल त्यांना क्लिअरन्स पोहोचलं..
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या आजच रात्री ९ वाजेच्या फ्लाईट ने छत्रपती संभाजीनगर येथून नेपाळ ला जाण्यासाठी दिल्ली ला निघत असून तेथून त्या नेपाळला सकाळ पर्यंत अपघात स्थळी पोहोचतील अशी माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षा खडसे यांच्या कार्यालयातून त्यांचे स्वीय सहाय्यक तुषार राणे यांनी ” मंडे टू मंडे न्यूज” शी बोलतांना दिली.
नेपाळ मध्ये बस नदीत कोसळून त्यात १४ प्रवासी भाविकांना जलसमाधी मिळाली, त्या बस मध्ये ड्रायव्हर कंडक्टर सह ४३ प्रवाशी होते, त्यातील १६ पेक्षा जास्त प्रवाशी भाविक जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या भीषण अपघातातील बहुतांश प्रवाशी हे जळगाव जिल्ह्यातील वरणगाव व तळवेल येथील आहेत.