तहसील कार्यालयातील शिपायाचा किरकोळ कारणावरून बेदम मारहाणीत मृत्यू
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l किरकोळ कारणावरून आठ ते नऊ महिला पुरुषांनी मिळून पती-पत्नीला बेदम मारहाण केली होती. यात जळगाव जिल्ह्यातील बोदवड तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेला पती गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल होते. परंतु तो गंभीर जखमी झाल्याने रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान त्यांचा दुपारी १२ वाजता मृत्यू झाला.
विलास सीताराम पाटील वय ४० वर्ष. रा. मनूर ता. बोदवड. जिल्हा जळगाव. हा तरुण बोदवड तालुक्यातील मनूर गावात पत्नी, मुलगा, मुलगी असा कुटुंबासह रहात असता तो बोदवड तहसील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते.
गुरुवारी दि. २२ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने एक मेलेला साप हा विलास पाटील यांच्या घराच्या अंगणात फेकला. याचा विलास पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील यांनी जाब विचारला असता याचा राग आल्याने शेजारील व्यक्ती नाना बाबुराव पाटील, विजय बाबुराव पाटील, नरेंद्र नाना पाटील, पवन नाना पाटील, अक्षय विजू पाटील यांच्यासह चार महिलां अशा आठ, नऊ महिला पुरुषांनी विलास पाटील व त्यांच्या पत्नी विद्या पाटील यांना लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. त्यात विलास पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने विलास पाटील यांना सुरुवातीला भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दखल केले असता उपचार सुरु असताना रविवारी दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता विलास पाटील यांचा मृत्यू झाला.
या बाबत नशिराबाद पोलिसांनी जबाब नोंदवले असून याप्रकरणी बोदवड पोलीस स्टेशनला विलास पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील यांच्या जबाबावरून नाना बाबुराव पाटील, विजय बाबुराव पाटील, नरेंद्र नाना पाटील, पवन नाना पाटील, अक्षय विजू पाटील यांच्यासह चार महिलां विरोधात बोदवड पोलियाब पुढील कारवाई करीत आहेत.