भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

दहावी,बारावीच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ, आता परीक्षाही महागणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ केलीय. जुलै ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी १२ टक्के शुल्कवाढ करण्यात आली आहे. आता दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० तर बारावीला ४४० रुपयांऐवजी ४९० परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. या परीक्षा शुल्कासोबतच प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, प्रमाणपत्र शुल्क, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क यासाठीही विद्यार्थ्यांना पैसे भरावे लागणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. तर अनुत्तीर्ण (रिपीटर) विद्यार्थ्यांसाठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात परीक्षांचे आयोजन करण्यात येते. गतवर्षी बोर्डाने परीक्षा शुल्कात १० टक्क्यांची वाढ केली होती. आता यंदाही परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा, महाविद्यालये यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

असे असणार परीक्षा शुल्क
खासगी विद्यार्धी नोंदणी शुल्क आता १२१० रुपये असणार आहे. तर परीक्षा शुल्क ४७० रुपये करण्यात येणार आहे. रीपीटर्स विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क ४७० रुपये असेल. तर प्रशासकिय शुल्क व गुणपत्रिका शुल्क प्रत्येकी १० रुपये घेतले जाईल. विज्ञान शाखेलतील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेसाठी १० रुपये आणि तंत्र विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. श्रेणी सुधार योजनेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ९३० रुपये आकारण्यात येतील. दरम्यान, गेल्या वर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्कात १० टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा १२ टक्क्यांची फी वाढ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!