भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

तरुण शेतकऱ्याची पेरूच्या झाडावार गळफास घेऊन आत्महत्या, रावेर तालुक्यातील घटना

निंभोरा, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या केळीला भाव नसल्याने केळी पिकवणारा शेतकरी चिंतेत आहेत .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी दि. ५ मे रोजी रावेर शहरात सभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी दि. ६ मे रोजी पहाटे रावेर तालुक्यातील निंभोरा येथील हर्षल रविंद्र नेहेते वय ३८ वर्ष व्यवसाय शेती या तरुण शेतकऱ्याने केळी पिकाला भाव मिळत नाही, लागलेला खर्चही निघत नाही, त्या मुळे आर्थिक विवंचनेत आता डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्याने पेरूच्या झाडाला फाशी घेत आत्महत्या केली.


रावेर तालुक्यातील केळी पट्ट्यामध्ये केळीला भाव मिळत नसल्यामुळे बहुसंख्य शेतकरी हे चिंताग्रस्त झाले आहेत. त्यातच हर्षल देखील केळीला भाव नसल्यामुळे व दररोज केळीचे भाव घसरत असल्याने, चिंताक्रांत झालेला होता.
सोमवारी दि. ६ मे रोजी पहाटे हर्षल याने स्वतःच्या शेतात शेत  गट न ११७७ मध्ये विहिरीजवळील पेरूच्या झाडाला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ग्रामस्थांना घटना समजताच त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. हर्षलच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.या बाबत निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हर्षालची दुःखद बातमी समजताच निंभरा परीसरत सर्वत्र शोककळा पसरली.मनमिळाऊ स्वभावाच्या हर्षलच्या पाच्यात पत्नी,आई,बहीण भाऊ व पाच वर्षीय मुलगी असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!