“त्या” १२ वर्षीय मुलाचा कापडाने गळा आवळून खून केल्या प्रकरणी १७ वर्षीय मुलगा भुसावळ पोलिसांच्या ताब्यात
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयाच्या पाठीमागील शेतात अनिल कैलास आव्हाड या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचा कापडाने गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार १६ जुलै रोजी समोर आला होता. या प्रकरणी भुसावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात भुसावळ तालुका पोलिसांनी या गुन्ह्यात विधी संघर्ष १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता घतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयाच्या मागील शेतात अनिल कैलास आव्हाड, वय-१२ रा. लोखंडी पुलाजवळ, भुसावळ या मुलाचा कापडाने गळा आवळून खून केल्याची घटना १६ जुलै रोजी उघडकीला आली होती. या घटनेबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्त विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिस पुढील तपास करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.