दारू बंदी साठी महिलांचं अनोखं भन्नाट आंदोलन,ग्रामपंचायत समोरच मांडलं दारू विक्रीच दुकान
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l गावात सर्रास अवैध दारू विक्री होत असताना वारंवार अनेक तक्रारी केल्या असता कुठलीही कारवाई केली गेली नाही. शेवटीं महिलांनी रणरागिनींच रूप धारण करत ग्राम पंचायत समोरच दारूच दुकान थाटत भन्नाट आणि अनोखं आंदोलन सुरू केलं.
लातूर जिल्ह्यातील वडवळ या गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरु असल्याने गावातील अनेकांना दारूचे व्यसन लागले. वयस्कर वृद्ध व्यक्ती सोबत तरुण मुले देखील दारूच्या आहारी गेले. व्यसनाधीन लोकांचा कुटुंबातील व्यक्ती ना व गावातील ग्रामस्थांना मोठा त्रास होऊ लागला. या साठी अनेकदा दारू विक्री बंद करावी म्हणून प्रशासनासह सर्व स्तरावर तक्रारी केल्या असता त्यावर प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली गेली नाही .सतत दुर्लक्ष्य केलं गेेलं. शेवटी गावातील महिलांना वेगळा भन्नाट मार्ग शोधावा लागला. सर्व महिला एकत्र येत रणरागीनिंचं रूप धारण करत गावातील ग्रामपंचायत समोरच दारूच दुकान मांडून दारू विक्री सुरू करून प्रशासनाचा निषेध केला.