राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या घोषणे बाबत मोठी अपडेट..
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात आचारसंहिता केव्हा लागणार या कडे राज्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करतीलच परंतु मिळालेल्या माहितीनुसार येत्या ४८ तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपत आहे त्या आधी निवडणुका व्हायला पाहिजे. महाराष्ट्र व झारखंडच्या निवडणुकांची एकाच वेळी घोषणा होण्याची शक्यता असल्याने राज्यातील महायुती सरकारने शेवटी शेवटी मोठे मोठे अनेक निर्णय घेतले. १५ नोव्हेंबरला राज्यात मतदान होण्याची शक्यता असून त्यामुळे येत्या २४ तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.