तरुण विवाहितेची यावल तालुक्यात माहेरी गळफास घेऊन आत्महत्या
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील माहेर असलेल्या २० वर्षीय विवाहितेने माहेरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार रोजी उघळकीस आली.
यावल तालुक्यातील मोहराळा येथील माहेर असलेल्या सिमरन आकीब तडवी. वय २० वर्ष. हिचे चोपडा तालुक्यातील लोणी पंचक येथील तरुणाशी लग्न झाले होते. सिमरन ही गेल्या काही दिवसांपासून माहेरी यावल तालुक्यातील मोहराळा येथे आली होती. दरम्यान, बुधवारी सायंकाळी सिमरनचे आई आणि वडील हे यावल शहरात कामानिमित्त आले होते. यावेळी ही विवाहिता घरात एकटीच होती. याच काळात सिमरनने घरी फवारणीच्या पंपाला बांधलेल्या पट्टीच्या साह्याने गळफास घेतला.
विवाहित तरुणीने हा प्रकार सायंकाळी सव्वाचार वाजता निदर्शनास आला. त्यानंतर तातडीने सिमरनला यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सिमरनला मृत घोषित केले. मात्र विवाहित तरुणीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही.
या बाबत यावल पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करत आहेत.