भुसावळ मध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार, रावेर तालुक्यातील तरुणावर गुन्हा दाखल
भुसावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर तालुक्यातील शुभम शैलेश कोळी या तरुणावर मंगळवार १ ऑक्टोबर रोजी रात्री भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरात आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या २४ वर्षीय तरूणीची
रावेर तालुक्यातील शुभम शैलेश कोळी रा. थोरगव्हाण ता.रावेर जि.जळगाव याच्याशी ओळख निर्माण होऊन या ओळखीतून शुभमने पीडित तरूणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून भुसावळ शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेवून अत्याचार केला. तरुणीने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिच्या सोबत लग्न करण्यास नकार दिला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरूणीने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पिडीत तरुणीच्या तक्रारी नुसार शुभम शैलेश कोळी रा. थोरगव्हाण ता.रावेर जि.जळगाव या तरुणावर १ ऑक्टोबर मंगळवार रोजी मध्यरात्री १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स पो नि गणेश धुमाळ हे करीत आहेत.