लग्नाचे वचन देत तरुणीवर वेळोवेळी अत्याचार, तरुणाला पंजाब मधून अटक
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l राज्यात लहान मुली,तरुणी अशा महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना आणखी एक नवीन घटना समोर आली आहे. आधीच महाराष्ट्र अत्याचाराच्या घटनांनी हादरला असताना तरुणाने एका तरुणीला लग्नाचे वचन देत तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
दिल्लीतील एका प्रदर्शना मध्ये तरुणीची एका राजेश अग्रवाल नामक २६ वर्षीय तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्या भेटी गाठी वाढल्या त्यावेळी राजेश नामक तरुणाने तरुणीला लग्नाचे वचन दिले. लग्नाचे वचन दिल्याचा फायदा घेत राजेश याने जनेवरीबते आगष्ट दरम्यान तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. मात्र लग्नाचा विषय काढताच थातुर मातुर उत्तर देत विषय मोडून काढायचा. सदरचा प्रकाराने तरुणीला आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने पोलिसात तक्रार दाखल केली. पिडीत तरुणीच्या तक्रारी वरून मुंबईतील खार पोलिस स्टेशनला राजेश अग्रवाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला पोलिसांनी त्याचा शोध करत पोलिस पथकाने राजेश अग्रवाल याला पंजाब मधील लुधियाना येथून अटक केली असून त्याला मुंबईत आणले असून पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.