घरात एकटी असल्याचा फायदा घेत २८ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l २८ वर्षीय महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत महिलेला धाक दपट दाखऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात समोर आला. या संदर्भात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गणेश संपत भिल वय २९ रा. पिंपरखेडा ता.भडगाव या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आपल्या कुटुंबासह रहात असलेली २८ वर्षीय महिला ६ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घरात एकटी असल्याचा फायदा घेत आरोपी गणेश संपत भिल हा महिलेच्या घरात घुसून जबरजस्ती तिच्यासोबत अश्लिल चाळे करत महिलेने विरोध केला असता तिचे तोंडू दाबून तिला धाक दपट दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या संदर्भात पिडीत महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या नुसार भडगाव पोलीस स्टेशनला आरोपी गणेश संपत भिल. वय २९ वर्ष. रा. पिंपरखेडा ता.भडगाव.
याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे हे करीत आहे.