महाराष्ट्रराजकीय

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही तास आधी राज्यपाल नियुक्त महायुतीचे ” हे ” सात आमदार ठरले !

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या काही तास आधी महायुतीचे राज्यपाल नियुक्त भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन असे सात नेते विधिमंडळात जाणार आहेत.

येत्या काही तासात निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार असल्याची शक्यता असून आचारसंहिता लागण्याच्या आत महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रस अजित पवार गट यांनी आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यात भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधिमंडळात जाणार आहेत.

महायुतीचे राज्यपाल नियुक्त ७ आमदार ठरले! राज्यपाल कोट्यातून ‘यांना’ संधी!

राष्ट्रवादी अजित पवार गट-  पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी
शिवसेना–  मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील
भाजप – चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि मुखेडचे विद्यमान आमदार तुषार राठोड

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!