भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

पावनगडावरील अनधिकृत मदरसे जमीनदोस्त, कमालीच्या गुप्ततेत पोलिसांची मध्यरात्री कारवाई

कोल्हापूर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क| कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पावनगडावरील अनधिकृतपणे अतिक्रमण केलेला मदरसा जमिनदोस्त करण्यात आला. प्रशासनाने पोलिसांच्या पथकांच्या सुरक्षेमध्ये या कारवाई करण्यात आली. हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर कोल्हापूर पोलिस आणि प्रशासन यांनी कमालीची गुप्तता पाळत हा अनधिकृत मदरसा रात्रीत जमिनदोस्त केला. मध्यरात्री दोन वाजता सुरू झालेली कारवाई आज सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान किल्ले पावनगडाकडे जाणारी सर्वच रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. 

पावनगडावर अनधिकृत मदरसा 1979 पासून केले असल्याची तक्रार हिंदुत्ववादी संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिली होती. मध्यंतरीच्या कार्यकाळात हा मदरसा बंद करण्यात आला होता, काही काळाने पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान, हिंदुत्वादी संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनान याबाबतची खातर जमा करत, आज त्यावर कारवाई केली. पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधून काही मुस्लिम तरुण या ठिकाणी सततचे ये जा करत असल्याची माहिती देण्यात आली होती.

किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यासाठी प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली होती. काल सायंकाळपासूनच या सर्व घडामोडींना वेग आले. किल्ल्यावर जाणाऱ्या सर्वच वाटा पोलिसांनी बंद केल्या होत्या. जिल्हा पोलीस प्रमुखासह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा किल्ले पावनगडावर रात्रीपासून मुक्काम ठोकला होता. कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळत आज सकाळी कारवाई पूर्ण केली.

किल्ले पावनगड म्हणजे किल्ले पन्हाळगडाच्या शेजारी असणारा गड आहे. शत्रूला चकवा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः पावनगडाची निर्मिती केली होती. याच पावनगडावर अनधिकृत बांधकाम होत असल्याचे तक्रारी हिंदुत्ववादी संघटनेने यापूर्वी जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र त्यावर कारवाई होत नसल्याने अखेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक भूमिका घेत मदरशांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या महिनाभरात दुसरी कारवाई करत, किल्ले पावनगडावरील मदरसा जमीनदोस्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!