भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

प्रेम विवाह केल्याने मामाचा भाचीवर धारदार शस्त्राने वार, यावल तालुक्यातील धक्कादायक प्रकार

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भाचीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामाने भाचीवर धारदार शस्त्राने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यातील पिंप्री गावात घडली.

यावल तालुक्यातील पिंप्री गावात भाचीने प्रेम विवाह केला. भाचीने  केलेला हा प्रेम विवाह मामाला आवडला नाही. या घटनेचा मामाला मोठा राग आला. आणि याच्या या रागातून उमाकांत कोळी या मामाने सख्ख्या भाचीवर धारदार शस्त्राने वार करून भाची लाच जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्या भानगड मध्ये मध्यस्थी करणाऱ्या भाचीच्या नणंदे वरही हल्ला करून जखमी केले. त्यातून ग्रामस्थांनी मात्र नणंद व भावजयीची उमाकांत कोळी या मामाच्या तावडीतून सुटका केली. आणि मामाला मात्र चांगलाच  चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले  असून पोलिसांनी उमाकांत कोळी या मामाला अटक केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!