पाल येथून युनिकॉन होंडा दुचाकी चोरी
पाल ता. रावेर. मंडे टू मंडे न्यूज, विनोद जाधव l पाल पोलीस दूर शेत्र भागातून भर दिवसा दुपारी 1 ते 2 या दरम्यान मोटरसायकल लांबविली पाल येथून पोलीस स्टेशन समोर मोटर वायडिंगचे दुकानावर उभी असलेली केशव महेंद्र जाधव यांची युनिकॉन होंडा कंपनीची दुचाकी MH19EM8844 पर्ल ब्लॅक कलर असून 28/11/2024 रोजी नवीन घेतलेली होती.
वडिलांच्या कमी वयात कोरोना काळात झालेल्या मृत्यू नंतर घरची जबाबदारी लहान असलेले दोन्ही मुलावर आली कसेबसे करून त्यांच्या उदरनिर्वाह चालू होता त्यातच त्यांच्याकडील ट्रॅक्टर मशीन विकून दुकान सुरळीत ठेवण्यात केशव व लहान बंधू मोहित याने यश मिळवले अगदी 14 ते 16 वर्षातील दोन्ही भाऊंनी जिद्दीने मेहनत करून नोव्हेंबर महिन्यात नवीन घेतलेली युनिकॉन होंडा या कंपनीची गाडी पोलीस स्टेशन समोर असलेल्या त्यांच्या दुकानासमोरून चोरी झाली तसेच या भागात काही काळापासून चोरीचे प्रमाण वाढले आहेत. पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे ठिक ठिकाणी चौकात बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थां कडून केली जात आहे.