केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्रीय मंत्री आणि बिहारचे ज्येष्ठ नेते रामविलास पासवान यांचं निधन झालं. त्यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पक्षाचे (LJP) नेते चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चिराग यांनी स्वतः Tweet करून ही माहिती दिली.
३ ऑक्टोबरला पासवान यांच्यावर हृदयशस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते रुग्णालयात होते. दिल्लीच्या रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७४ वर्षांचे होते. बिहारच्या राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती आणि केंद्रीय पातळीवर किंगमेकर ठरलेले रामविलास पासवान यांनी 2019 मध्येच निवडणूक राजकारणातली 50 वर्षं पूर्ण केली होती. आता बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.