केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्या हस्ते पाल येथे होणार शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन
पाल, ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधील भागलपूर येथे आयोजित कार्यक्रमात पीएम किसान सन्मान निधीच्या 19 व्या हप्त्याचे प्रकाशन करतील. सुमारे 9.80 कोटी लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यात ₹2,000 प्राप्त होणार असून त्या अनुषंगाने भव्य शेतकरी परिसंवाद व कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र पाल. ता . रावेर येथे वेळ दु. 11 वा केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार अमोलदादा जावळे.
भा.ज.पा. जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष, अशोक झांबरे. अध्यक्ष सातपुडा विकास महामंडळ पाल सुरेशभाऊ धनके, प्रदेश सदस्य नंदुभाऊ महाजन रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख सौ. केतकीताई पाटील महिला मोर्चा राज्यउपाधक्षा सौ रंजनाताई प्रल्हाद पाटील महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, पद्माकरभाऊ महाजन, जिल्हा उपाध्यक्ष हरिलालभाऊ कोळी जिल्हा सरचिटणीस सुनीलभाऊ लक्ष्मण पाटील. पं.ग्रा.वि. विभाग प्रदेश सदस्य उपस्थित राहणार असून सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महेश काशिनाथ चौधरी. तालुका अध्यक्ष भाजपा. दुर्गादास प्रभाकर पाटील, रविंद्र तुळशिराम पाटील, योगेश सुरेश बोरोले , सरचिणीस भाजपा रावेर, चेतन श्रावण पाटील, युवामोर्चा तालुकाध्यक्ष यांनी केले आहे.