क्राईमरावेर

डॉक्टरांची बदनामी केल्या प्रकरणी नर्स महिले विरुद्ध अदखलपात्र गुन्हा

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l डॉक्टरांनी कामावरून कमी केल्याचा राग मनात धरून एका महिला नर्स ने सोशल मीडियावर तिचा आणि डॉक्टरांचा फोटो लाऊन डॉक्टर यांची बदनामी केली. या संदर्भात डॉक्टरांच्या तक्रारीवरून संबंधित नर्स महिले विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सन २०२३ मध्ये पाच ते सहा महिने रावेर तालुक्यातील सावदा येथील सदगुरू हॉस्पिटल मध्ये सदर महिलेने नर्स म्हणून काम केले होते. परंतु काही कारणांनी डॉक्टरांनी सदर नर्स महिलेला कामावरून काढून टाकले होते. याचा राग मनात धरून महिला नर्स ने १० रोजी सकाळी ९ वाजे पासून तिच्या मोबाईलवर स्टेटस, डिपी, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावर तिचा आणि डॉक्टरांचा फोटो लाऊन डॉक्टर यांची बदनामी केली.

या संदर्भात सदगुरू हॉस्पिटल चे डॉ.चेतन कोळंबे यांनी दि. १२ फेब्रुवारी बुधवार रोजी सावदा पोलीस स्टेशनला संबंधित नर्स महिले विरुद्ध तक्रार दिल्याने सावदा पोलिस स्टेशनला महिले विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावदा पोलीस करित आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!